Monday, March 9, 2020

आठवणींचा पक्षी

आठवणींचा सुंदर पक्षी,
आज अचानक,बसला येऊन.

दावितसे मोहकसे विभ्रम,
रंगपिसारे फुलवून फुलवून.

जा रे पक्ष्या! जा तू येथून,
नको तुझे मज लाडीक चाळे.

वर्तमान क्षण भुलतो माझा,
भविष्य बघते,रोखून डोळे!

अस्तित्वाचा डंख तुला ना,
मजला याची आहे जाणीव!

निळी निळाई ,नवी नव्हाळी,
स्वप्नसुमांकित रेशीमराणीव..

जा बाबा जा! तुला विनवितो
 नकोस लावू लळा मनाला,

ये एकांती पुन्हा कधीतरी,
गुंफू स्मृती मोत्यांच्या माला.

                  .🍃संतोष

2 comments:

  1. "रेशीमराणीव" म्हणजे काय?

    ReplyDelete
  2. राणीव.. म्हणजे राज्य
    रेशीमराणीव स्वप्न सुमांकित आहे
    कुणाची आपल्या आठवणींची..
    संदर्भ..
    ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव
    इंद्रायणी काठी ऐकलं आहेस ना?

    ReplyDelete

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...