Thursday, March 12, 2020

चिऊ


एक होती चिऊ,
तिला होती जाऊ.

काही केल्या पटेना,
घरचं भांडण मिटेना.

त्यांना दिसला कावळा ,
वेष काळा सावळा.

कावळेदादा याल काय?
भांडण मिटवून जाल काय?

कावळा सांगे युक्ती.
कुटुंब नियोजन सक्ती.

एक मूल,एक चूल,
नकोच नाती,भांडणभूल.

हा! चूप!,कोणी बोलू नका रे,
कावळा बाळगून परकी पोरे!

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...