फ्रॉकमध्येच पोर,
तरी जीवा घोर.
कायद्या माथी फोडतो
खापर,
वाटतं वाचू नये
पेपर.
उगी मन होतंय
कष्टी,
दृष्टी आड बरी
सृष्टी..
गढूळ,किरट्या, फिरत्या नजरा,
झटकून गेल्या पुढे.
सावित्रीच्या
लेकी लढल्या
अदृश्यसे लढे.
वाटलं नव्हतं,नजरा
अशा अजगर बनून
वळतील,
अल्लड अवखळ बागडणारी
सुंदर हरणं गिळतील!
पुन्हा एकदा नवीन
युद्ध पदर खोच बाई
नजरा वयात येण्याआधी
घडव होऊन आई.
आहे आता सोबत
त्याची, एकाकी ना लढा,
तोडून तुटेल ,सोडवून
सुटेल, अवघड तसला तिढा.
No comments:
Post a Comment