कळण्याच्या नाजूक वळणावर,
अडनिड,अडखळताना पाऊल.
नकाच धावू आधार देण्या,
उगाच छाया,चिंता चाहूल.
झूल बाजूला ठेवून जावे,
नैतिक उपदेशाची सुंदर.
भिरभिरता नजरांच्या होड्या,
मूकपणे व्हा त्यांचे बंदर.
नकळत दावा गरुड नभीचा,
मोरपिशी मखमल विणताना.
त्यांचे त्यास कळूदे अंतर,
भावगुंतल्या वनी शिणताना.
हेच शेवटी आपुले मानस,
वळणावरची दरी दिसू दे.
हितगुज मनीचे,नव्हेच सल्ला,
आमची,तुमची,कळी हसूदे.
🌹
.🍃संतोष
अडनिड,अडखळताना पाऊल.
नकाच धावू आधार देण्या,
उगाच छाया,चिंता चाहूल.
झूल बाजूला ठेवून जावे,
नैतिक उपदेशाची सुंदर.
भिरभिरता नजरांच्या होड्या,
मूकपणे व्हा त्यांचे बंदर.
नकळत दावा गरुड नभीचा,
मोरपिशी मखमल विणताना.
त्यांचे त्यास कळूदे अंतर,
भावगुंतल्या वनी शिणताना.
हेच शेवटी आपुले मानस,
वळणावरची दरी दिसू दे.
हितगुज मनीचे,नव्हेच सल्ला,
आमची,तुमची,कळी हसूदे.
🌹
.🍃संतोष
No comments:
Post a Comment