करून मोठे सम्मेलन
,जमले पुष्कळ कवी.
डेरा भरून घुसळत
बसले,शब्द,घेऊन
रवी.
काढू लोणी,कढवू
तूप,मनात खाल्ले
मांडे खूप.
कविता नाही आली
हाता ,सुकली शाई,लिहिता गाता.
अरसिक झालेत लोक
म्हणून नाही आले
लोणी .,
हळूच माझ्या कानी
बोले,जाता जाता
कोणी.
कसली कविता,
कसले लोणी,अळवावरून
सरले पाणी.
विरजण नाही जमले,किंवा दुधांत
होते पाणी,
उरल्या थोड्या,
अशा चिकित्सा ,लोणकढलेल्या पानी.
No comments:
Post a Comment