Thursday, March 12, 2020

रे फुलांनो


रे फुलांनो माज कसला
का मुखांवर मग्रुरी?

तप्त सुंदर शौर्यहि जे
उद्यमी वा संगरी .

वक्षनक्षि लक्षूनि,अली,पक्षी मधुस्तव झोंबले 
भाट ते तुमचे ,वदा काही ,तये अनुमोदले .

गौर वा ती स्वर्णकांती ,सहजचि कुणी भाळले ,
श्रेय ते त्यांचे ,जयांनी कौतुके प्रतिपाळले .

मिरवुनी घ्या जोवरी ,प्राजक्त पुष्पी न्हाणतो
येतसे वैशाख वणवा, अंती अनल दणाणतो .

दर्प आणि परिमळातील भेद आम्ही जाणतो
सोज्ज्वळांचे गन्ध ज्या,ती मस्तके अवघ्राणतो.

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...