Thursday, March 12, 2020

सुलटे एक ,उलटे दोन


सुलटे एक ,उलटे दोन,
थकतील बोटं,विणून विणून,
भ्रामक खजिना,स्वप्नांमधला,
शिणेल मनही,खणून खणून.

शून्यच असेल झाकल्या मुठीत ,
मिळणार काय ,गुणून गुणून ?
कंबर कसून, झटावं,सोसून,
उपयोग नाही,कणहून कणहून.

घेतला 'हातचा' टाकावा देऊन,
फाटेल झोळी,घेऊन घेऊन.
पानात पडेल ते घ्यावं जेऊन,
जीभ होई चाबरी,खाऊन खाऊन.

अडचणीचं घोडं,नमणार नाही,
बसल्याशिवाय,मांड ठोकून,
आयुष्याचे प्रश्न ,सुटणार नाहीत,
उसनी उत्तरं, घोकून घोकून.

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...