फ्रॉइड म्हणे कामवासना,
कांट सांगे
नीती.
"पुर्णमन"हेगेल
म्हणे,
त्रयावस्था गती.
आता सांगा,कराल काय?
सगळ्या मनि तसले घाय?
भक्तीविना नीती दृढ
,
करू जाता,बनू
मूढ.
खुंटीविना फिरे जाते,
अंध दळे,श्वान खाते.
"पूर्णमनांचे"
फाटून पट,
पडले डावे,उजवे
गट.
चोरांहातीचे लंगोट,
मार्क्स
उरले चिंधोट.
वेदांताचंच,पालीमधून
अमृत शिंपत
हिंडलाय बुद्ध.
विविध रूपात वाहती
नद्या,
उगम इथं आहे शुद्ध.
तोच शंकर अद्वैताचा,
चरवत आहे
इथं नंदी.
तोच मोहन,वृत्ती
गोपी,
पावा फुंकत,लावत छंदी.
तोच राम,चाखत
आहे,
भिल्लिणिची,भक्ती
बोरं ,
पंढरीच्या,वाळूमध्ये,
खेळत आहेत
वैष्णव पोरं.
द्वैतबली,वसूल करत,
बसली आहे
कालीमाता.
सुप्रेमाचा मोदक खाऊन
ढेकर देतोय विघ्नहर्ता.
नकोयत बाबा,फ्रॉइड
प्रभृती,
किचकट कांट,हेगेल.
विवेकाच्या ज्योती जिथं,
तो ते
" दर्शन" भोगेल.
No comments:
Post a Comment