वड आजोबा गावाकडले
झालेत थोडे वृद्ध
!
कारण नसता कधी
कधी ,उगाच होतात
क्रुद्ध .
अंगाखांद्यावर
आता ,खेळत नाही
कुणी !
पूर्वीसारखी गात नाहीत
,म्हणे पक्षी गाणी
.
हाक मारुनी उगाच,म्हणतात ,या रे खेळा लोम्बा
!
दाढीमिशा धरून पोरांनो
वाटेल तसे झोंबा.
आटोपशीर राहणं तसं,त्यांना जमत नाही !
पसरल्याशिवाय
अंग जरा, त्यांना करमत नाही.
गुंडाळून घेतात
दोरा खुशाल ,एक
दिवस खुशीत !
निमित्ताने तरी आले
म्हणून ,हसतात हळूच
मिशीत .
किती वर्षे ,किती
महिने,किती दिवस
गेले ?
वड आजोबा विणत
नाहीत ,हिशोबाचे शेले
.
कृमी,कीटक ,पक्षी
,प्राणी ,आसऱ्याखाली राहतात ,
वड आजोबा त्यांचं
सगळं ,हवं नको पाहतात .
उघडं आकाश पांघरून
घेतात ,वाऱ्याशी करतात
गप्पा ,
कधीतरी उघडून बसतात
,आठवणींचा कप्पा .
असे आमचे वड
आजोबा ,वृत्तीने अघळ
पघळ !
वय परत्वे सुरकुतलेले
,चिडके तरीही प्रेमळ
.
No comments:
Post a Comment