Thursday, March 12, 2020

दृष्टी


(केशव सुतांची क्षमा मागून,)
दिक्कालांतुन आरपार पाहण्याची ,बनवून आणलीय आम्ही  दृष्टी .

काळाची आता खैर नाही
इतिहासाशी मग वैर नाही!

सापेक्षता आणि पुंजवाद ,
द्वैताद्वैत,मायावाद !

कुठलाच विषय आता गैर नाही.

अचूक सांगु  जन्मवेळ ,शिवाजी आणि बुद्धाची.
महाभारत ,रामायण,बातमी प्रत्येक युद्धाची.

आर्य कोण,कुठून आले?राक्षस,देव कुठे गेले?
पुराव्यासकट टिपण देऊ,जे जे जगले आणि मेले.
------
प्रत्येक मूल शिकेल का? शिकून जगात टिकेल का?
नवीन जगात धडपडताना ,घरचा रस्ता चुकेल का?

असलं काही विचारू नका,प्रश्न तुमचा जाईल फुका.

काय आहे दृष्टी जरा जवळची आहे कमी,
लांबचं विचारा ,देतो आम्ही,
 १०० % उत्तर हमी!

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...