नितळ निळे,शांत
तळे,
स्फटिक शुभ्र जल
तयात.
रक्षित त्या भाऊबहीण,
असती वसत नित्य
जेथ.
तृषार्तांसी नित्य खुले,
होई हर्ष
तृप्त सर्व ,
वृक्ष तरु,देती
डोल,
सहज पुण्य,नाही गर्व.
ज्ञान,भक्ती बंधुभगिनी,
गौर ज्ञान,भक्ती
श्याम,
मन मानस हेचि
तळे,
जल भरले शुद्ध प्रेम.
परी विकल्पलीप्त दगड,
फेकीतसे दुष्ट कुणी,
तळ सारा ढवळोनि
गढूळलेच सर्व
पाणी .
प्रतिक्षेस मोल आता,
जोवरी हे चंचलपण,
मूढ कुणी तितिक्षेस,जात वदत आळस पण !
No comments:
Post a Comment