येता जाता लावीत
पाय,
जाती सगळे,करू
काय,
घाण लागली अवघ्या
अंगा,
शेजारी चपलांच्या रांगा.
काय जिणे हे
अपमानास्पद,
जो तो पुसतो
गलिच्छसे पद.
कुणीही प्रेमाने ना वागे,
भिंतींवर धोपटती रागे.
आंग्ल परी ती
हाक ऐकुनी,
सुखद वाटली 'मॅट'
म्हणोनि.
रूप नवे ,नवनवीन
नक्षी,
'वेलकम' ऐशी बिरुदे
वक्षी .
दुकानांतुनी विविध छटांची,
पायपुसण्यांची,पाहता रंगत,
हळूच बेटे हांसत
म्हणती,
आम्हालाही आली किंमत.
No comments:
Post a Comment