चुलीत लाकूड जळत
नाही,
धुरात डोळा गळत
नाही,
पाट्यावर पुरण वाटत
नाही,
मऊसूत पोळ्या लाटत
नाही.
नऊवारीमध्ये नटत नाही,
व्रत वैकल्ये,पटत नाही.
पण,म्हणून काय,....
उरात माया दाटत
नाही?
घड्याळाबरोबर पळत नाही?
लंचचे दोन घास गिळत नाही?
घरात बाईपण टळत नाही,
तरी,
गाऱ्हाण्याचं दळण दळत
नाही.
आई अजून तीच आहे
,संदर्भ फक्त वेगळे,
कळतंय सगळं, पण फक्त
वळत नाही!
No comments:
Post a Comment