Monday, May 19, 2025

दसरा

 दुःख निराशा सारी विसरा

पंख नवोन्मेषाचे पसरा

चेहरा ठेवा सदैव हसरा

सण वर्षाचा आला दसरा


मिष्टान्नांनी सजू द्या पाने

लुटा आपटा शमीची पाने

मंजुळ मंगल आळवा गाने

ह्रदय भरो निर्मळ हर्षाने


सुह्रुदांचाही जमेल मेळा

भावक्षणांची पंचीम खेळा.

पूर्ण मुहुर्ती येतो तिसरा,

सण वर्षाचा आला दसरा.


सोन्यासम तुम्ही रहा म्हणावे

सोने घ्यावे सोने द्यावे.

शुभ चिंतावे शुभ बोलावे

नववस्त्रांनी शोभित व्हावे.


अमंगळाचा रावण जळूदे

कुवासनांचे विघ्न टळूदे

सुविचारांचे दान मिळूदे,

दंभयुक्त जे मीपण गळूदे.


दिपावलीचे वेध लागतील,

आठवणींचे दीप जागतील.

उत्सव ऐसा नाही दुसरा

सण वर्षाचा आला दसरा.


                         .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...