अनादि तत्वा,हे निजसत्वा
प्राणप्रतिष्ठा कशी करु?
भरुनी सारे दिगंत उरशी
हाती तुजला कसा धरु?
ओंकाराचे नित आवर्तन
तिथे आरती कशी गावी?
ब्रह्मरसाचे सुटता पाझर,
पक्वान्ने कशी अर्पावी?
जळी स्थळी तू व्यापुन असशी
कोण विसर्जन करु शके?
मुळारंभ तू व्योमप्रकाशी
तर्क, कल्पना,मती थके.
तुझ्या कृपेने उत्सव घडतो
ना तर सारे देखावे
ज्याचे त्याला ठावे मानस
कुणी कुणाला जोखावे?
अगा निर्गुणा येशी बनुनी
सगुणाची सुंदर मुर्ती..
म्हणुनि धजतो करण्या पुजा
गजवदना मंगलमुर्ती.
🙏
. 🍃संतोष
No comments:
Post a Comment