Monday, May 19, 2025

आम्ही कोण

 आम्ही कोण म्हणोन काय पुसता,

आम्ही जगा दोडके..

होते छत्र,तुरे शिरी जिथे,

आता असे बोडके..


गेले विक्रमनृप,वीर गळले, 

हाती आता बांगड्या

पिंका टाकीत,चौक फक्त भरुया

बाता उगी रांगड्या.


गेला काबूल,सिंध प्रांत अवघा

त्याला युगे लोटली.

गेले काश्मिर,केरळी कुणी नसे

सत्ता कुणी घोटली?


कसले विश्वगुरुत्व,येथ अपुले

शिष्यत्व ही लोपले

झेंडे फक्त इथे तिथे फडकती

आचार्यही झोपले.


अपुले छान पवित्र पुज्य सगळे

'खुळचट रूढी ' मानुया..

गीता,स्तोत्र नको,सण नको 

बुद्धी चला ताणुया.


चोलांच्या अन् रम्य पूर्वसुरीच्या

गप्पा चला मारुया

हसतो तेथ मलेशिया,सर्व 

आशिया ,बंगालही हारुया..


हे झगडे नव्हेत फक्त वरचे

काफिर नको याजला

गेले ' पाक नबी ',असेल वरती

मुहम्मद ही वैतागला.


आम्हां काय कधीच त्याज्य नव्हते 

साधू सूफी अन् वली...

पण हा मुर्ख जमाव यांस असते

धर्मांध बिरुदावली..


घर अपुले जपण्या,हवी पुन्हा

वेदोद्भवी संस्कृती...

हाती शास्त्र तसेच शस्त्र असूदे

फैलावली विकृती...


                     .🍃 संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...