ताल महर्षी झोपला
उरी होतसे आघात
असा पुन्हा नाही होणे
'काल'जयी सिद्ध हात..
शेज करुनिया 'साज'
जरी झोपलेला 'ताज'
वाजे कानात मनात
धुंद तबल्याची गाज..
बाया दाया दोहों बाजू
मधे ताल अनाघात
सम चिरविश्रांती ची
कशी आली अकस्मात?
आर्त मात्रांचे चलन
आता 'बोल' होती मुके
'भरी' 'खालीं 'चे वजन
आता कोण पेलू शके?
किती झाले,होतीलही
परि ऐसा नाही होणे..
वीज बोटांत तरीही
त्यांना रेशमाचे लेणे..
अरे नियंत्या तू नेले,
जरी मैफिलीत दूर
इथे त्यांनी पेरलेले
लक्ष,जगात 'झाकिर'..
.🍃 संतोष
No comments:
Post a Comment