Thursday, March 12, 2020

लोकशाही देवी


लोकशाही देवी तुझी आली जवळ जत्रा.
खोबरं तिकडं चांगभलं,प्रचार,शोभायात्रा.

अशोकाचा चवथा सिंह,द्रुष्टीआडच राहिला,
सत्यप्रेमी गांधी आम्ही नोटेवरच पाहिला.

समांतरच तिरंग्याच्या,अजून रंगरेषा,
रुतले निळे चक्र जागी ,नाही गती,दिशा.

एक दिवस राज्य,त्याचे पाच वर्ष ओझे,
सत्तर वर्षे,हेच केले,आम्ही लाजेकाजे.

तुझ्या पदी किती वाहू,मतांची मी फुले,
दारी तुझ्या सत्तेचा हा मत्त हत्ती झुले.

जमतील जेव्हा भाट  तुझे,गातील पुन्हा गाणी,
ध्यानी तुझ्या असुदे गं ,आमची हि विराणी.

चला लोकहो,लावा रांगा ,करूया निळी बोटे,
पावो देवी आम्हा तुम्हा ,नाही तर नशीब खोटे.

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...