क्रूर काटे ,पदर
काही
त्यांस लागून फाटले
पण दुधारी खडग
हाती
भय न त्याचे
वाटले
रास्त शंका कोकिळेची
आम्रतरु ना दाटले
संपले सरले ऋतू
,
त्या कावळ्यांना वाटले
मोजक्या बछड्यांसवे ती
दूर वाघीण चालली
श्वान मिळुनी भुंकले
त्या राज्य आले
वाटले
लाल भगव्या रक्तिम्याची
रेखिली ज्यांनी चिरी
ध्यास वेड्या वादळाचे
,
श्वास घुमणारे उरी
त्या गुहांतून सिंहिणींच्या ,
रानछावे वाढती
बाललीला बघुनी त्यांची
दृष्ट झाडे काढती.
या धरेवर स्वागतांची
,
तीच मंगल तोरणे
सिंह येतील ,शांत
होतील
जम्बुकांची गायने.
No comments:
Post a Comment