Monday, March 9, 2020

टोप्या

मुगुट झाले नकली
आणि टोप्या झाल्या असली.

घातल्या त्यांनी ज्यांना,
त्यांची पोरे बाळे फसली.

रंग कोणता,कसा आकार,
प्रश्न फोल परि करी बेजार.

म्यानांसाठी थोड्या,
लढती, तलवारी शेकडो,हजार.

नाही ठिणगी,पडला वारा,
समिधांचा हा उरे पसारा.

यज्ञ करु, हे निव्वळ भाषण,
कुणी न त्यागी मृदु सिंहासन.

बरे टोपीचे इथे प्रयोजन,
कळपाची मग,सोपी राखण.

टोपी खाली दडलंय काय?
डोकं आमचं! दुसरं काय?

तेच वापरु असेल शिल्लक,
आम्हीच आमचे ,शोधू उपाय!

                    .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...