Monday, March 9, 2020

पाचोळा



गळे पिकून पाचोळा,
तरुतळी पडे खच.

झुरे निखळले पान,
उरे देठावरि बोच.

दोष पिकल्या पानांचा,
काही नाही,काही नाही.

गुन्हा झाडाचाही नाही,
म्हणो कुणी काही बाही.

आहे खोड हे जाणून,
ज्याची मुळे गेली खोल.

वरी रुक्ष दिसे जरी,
त्याच्या अंतरात ओल.

फिरे ऋतुचक्र,मिळे
पाचोळ्याचे मुळा खत.

बसे फांदीफांदीतून,
पुन्हा पाचूंची पंगत.

                .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...