Monday, March 9, 2020

आमच्या वेळी..

आमच्या वेळी कसं होतं,
आमच्या वेळी तसं होतं!
नका सांगू भलतं,सांगा,
आमचं सुद्धा असंच होतं.

अधूनमधून,स्वप्नी अजून,
हुकले जे ते दिसते फुल.
चौकट उसवून जाऊन येते,
मन,बुद्धिला देऊन हूल.

टाचांवरच्या काच खुणांची,
बोलून टाका मग गुपिते.
मैत्रीच्या नात्याचे बंधन,
मुक्त मनी,वचना जपते.

विरळ जाहल्या डोईवरचा,
पिकलेला अनुभव मोठा.
ठेच लागता कळेल जेव्हा,
जिवलग होईल मग बेटा.

तोवर थोडी,भांडण गोडी,
पिढी पिढीतील वाद जुना,
वाद उरो,संवादरुपातच,
नकोत फसव्या,मौनखुणा.

                    .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...