तसे पावसाचे गाणे ,
सोपे साधे नि
सरळ ,
नाही पेचदार ताना
तरी जीवाला भुरळ
आधी विलंबित ठेका
होई सावकाश द्रुत
घुमे दिशांच्या कानांत
चिंब धारांचे संगीत .
घन झरे सूर
धारा ,
झाला तानपुरा वारा
नाद कण कण
पारा ,
खेळे तनात,मनात
नको मल्हाराचा शिक्का
पावसाच्या गाण्यावर ,
शास्त्र व्यापूनि उरले
लय सूर पाण्यावर
अंती पावली भैरवी
धुंद माती गंधाळली
.
सुखावून त्या पानांनी
,
टिपे लोचनी गाळली
.
असे पावसाचे गाणे ,
कसे सोपे नि
सरळ .
परी थरारली सृष्टी
गळे सारी मरगळ
No comments:
Post a Comment