कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त सुचलेल्या काही ओळी...
हे काव्य भाषा भास्करा,
नभ व्यापुनी झळके ध्वजा.
अक्षयी त्या अक्षरांचे,
दान द्या,कुसुमाग्रजा!
अजुनी कानी ती जुलेखा,
वीजभाषा बोलते.
अजुनी पोळे ती विशाखा,
अंतरीचे बोल ते.
अजुनी नाही त्या तुफाना,
द्वार कोणी खोलले,
मानवाचे आर्त त्यां
सर्वेश्वराशी बोलले.
वदत वंदे भाकरम् ती
अजुनी जाळी वंचना.
उपेक्षोनि शिव जीवींचे
मोल चढते कांचना.
लंघुनी सीमा जगातील
शब्द तुमचे गर्जती
परि मनाला प्रश्न वेडे
काहीसे ते गांजती.
दंभमूर्तींवर घणांनी
घाव ज्या तुम्ही घातले,
त्या घणांना देव म्हणुनी
हार कोणी घातले?
लेकरे आम्ही आम्हाला
फक्त हा आशीष द्या
ताठ राहो हा कणा
अन् स्वाभिमानी शीष द्या.
. 🍃संतोष
हे काव्य भाषा भास्करा,
नभ व्यापुनी झळके ध्वजा.
अक्षयी त्या अक्षरांचे,
दान द्या,कुसुमाग्रजा!
अजुनी कानी ती जुलेखा,
वीजभाषा बोलते.
अजुनी पोळे ती विशाखा,
अंतरीचे बोल ते.
अजुनी नाही त्या तुफाना,
द्वार कोणी खोलले,
मानवाचे आर्त त्यां
सर्वेश्वराशी बोलले.
वदत वंदे भाकरम् ती
अजुनी जाळी वंचना.
उपेक्षोनि शिव जीवींचे
मोल चढते कांचना.
लंघुनी सीमा जगातील
शब्द तुमचे गर्जती
परि मनाला प्रश्न वेडे
काहीसे ते गांजती.
दंभमूर्तींवर घणांनी
घाव ज्या तुम्ही घातले,
त्या घणांना देव म्हणुनी
हार कोणी घातले?
लेकरे आम्ही आम्हाला
फक्त हा आशीष द्या
ताठ राहो हा कणा
अन् स्वाभिमानी शीष द्या.
. 🍃संतोष
No comments:
Post a Comment