Monday, March 9, 2020

मुक्तछंद



मुक्तछंद,ऐसा ,जैसे
तराण्याचे बोल,

शब्द रुपहीन तरी
आशय सखोल.

मनी दाटलेले भाव,
शब्दां नाही धीर,

कासेतून झरे जसे
अधीरले क्षीर,

त्या काव्याला खरी शोभे,
संज्ञा मुक्तछंद,

भावनांच्या प्रवाहाचा
प्रवास बेबंद..

बाकीच्यांनी उताऱ्यांच्या
रचल्या ह्या भिंती.

अर्थ चिणलेले,
भाव कण्हुनिया कुंथी!

अशा मुक्तछंदांपेक्षा
वाचा कादंबरी,

कळायला सोपी आणि
पचायला बरी.

                   .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...