मुजरा साहेब मुजरा,
जमिनीत गाडल्यात नजरा.
तुमची सदा सुट्टी,
आमच्या डोळ्यावर पट्टी.
लिहून घ्याजी अर्जी,
असू दयाजी मर्जी.
मारू पुनःपुन्हा चकरा ,साहेब!
मुजरा
साहेब मुजरा,
हुद्दा तुमचा मोठा,
पुरत नसतील नोटा,
आमचा खिसा छोटा
दाखवू नका सोटा,
चुकलं माकल विसरा,
,साहेब! मुजरा साहेब
मुजरा,
स्वगत :-
(लोकशाही मधले आम्ही
मतदार राजे,
औट घटका राज्य,
जो तो आपली पोळी भाजे.)
प्रगट:- तक्रार ? छे छे ,नाही!
आमची एवढी खात्री
धरा . मुजरा साहेब
मुजरा,
No comments:
Post a Comment