छिन्न गात्र स्वाभिमान,
रुधिरस्नात मेदिनी,
थरथरले नंदनवन,काळ
ये रणांगणी. |1|
कुणी विधवा ,कुणी
अनाथ,
कुणी माता ,करी
आकांत.
सूड सूड उठत
ध्वनी, स्वर
घुमती अभिमानी |2|.
शांतिदूत श्रांत क्लान्त,
अहिंसेस पडत भ्रांत.
षंढ षंढ चिरत
येत ,बोल अंतरातुनी.|3|
किती अजुनी बलिदाने?
जात व्यर्थ यौवने?
कोण बोलते अजून
,अरी जिंका प्रेमानी?|4|
सांत्वनपर बोल फिके,
शब्द थिजून होत
मुके,
कोण भूप
तोलू शके,प्राण
हे धनातुनी?|5|
No comments:
Post a Comment