उगीच कशाला आढेवेढे,
सरळ सांगतो,एकदम
स्पष्ट.
मनात येतात पुष्कळ
इच्छा,
त्यातल्या काही 'नीतिभ्रष्ट'.
कुरवाळले तर करतात
दंश,
मारू जाता शेकडो
वंश.
निचरा करण्या कुठली
जागा?
उरतो केवळ षंढ
त्रागा.
बोललेलं बरं,आपल्याशी
खरं,
नजरेला नजर ,भिडवलीय
जर
इच्छांचे दाणे,विवेकाचे
सूप,
पाखडून,निवडून घेतल
मी खूप.
पण सांगू जरी
उरले मूठभर दाणे,
भरली माझी झोळी,
आली ढेकर
सुखाने.
No comments:
Post a Comment