फडताळलेल्या जीर्ण पोथ्या,काजळलेला दिवा.
घुमटीमध्ये फडफडणारा ,एकाकी पारवा.
तेलकट उभी मूर्त,साखर ,तांदुळाचे
दाणे.
ऐसे आमच्या देऊळांचे,विषणण गार्हाणे.
नाही पूजा ,नित्यकर्म,चिल्लरींचा क्षुद्र धर्म.
दैन्य , आणि औदासिन्य,नाही मर्म
,नाही वर्म.
( सद्गुणांच्या
गाभाऱ्यात ,भक्ती हीच
मूर्ती,
विवेकाची प्रभा फाके,ज्ञान शुद्ध
ज्योती.)
मनि दिव्यत्वाची जरी प्रार्थितो
राउळे,
वास्तवाचे दृश्य छळे,जीव तळमळे
.
No comments:
Post a Comment