एकांताच्या गावी इथे,कल्पनांची गर्दी,
अर्थ फुटायाची लागे शब्दांनाच
वर्दी.
श्रेय हवे कुणा
जेव्हा ओसंडतो मेघ.
कीर्तीसाठी तम चिरे,
प्रकाशाची रेघ?
अंतरीच्या कल्लोळाला,शब्दांचे सारथ्य.
पेलवेना गद्यी, तेव्हा
कवित्वा अगत्य.
वेडे जग येथे
सारे ऊर्ध्वमार्गी डोळे,
स्वानंदाचे झरे ! नको लौकिकाचे तळे.
आहे पाटी,चक्क
तिथे,
पीश्यांना प्रवेश,
अस्सलाची कुळे ज्यांची,
उन्मेषांचे देश.
यांच्या वेडातुन झाली शहाण्यांची
गावे,
पेरुनीया गेले किती,कोण?कुणा
ठावे?
No comments:
Post a Comment