Thursday, March 12, 2020

दुरून नमस्कार !


ग्रीष्मातच अचानक 
मोर लागतात नाचू,
कोळश्याच्या खाणीमध्ये,
हिरे आणि पाचू?

तेव्हा थोडं थांबून,
पाहावं जरासं लांबून.

पांढऱ्याशुभ्र दाढीमागे,
लपवलाय का व्रण? 
भरलेलं शेत आहे 
का माजलेलं तण?

मौनाच्या ढोलीत,
घुबड आणि साप,
पुण्याईच्या अस्तनीत,
निखाऱ्यांच पाप.

बहरायची वेळ यांची,
गेल्यावर टळून,
भलतेच मोहोर मग,
पाहतात वळून.

मोरांची पिसं 
पडताच गळून,
दंभाचे कावळे,
येतात कळून.

म्हणून....

खावे आपले पुरचुंडीत,
सुदाम्याचे पोहे,
गावे आपल्याच आवाजात,
ओव्या आणि दोहे.

बरा आपला विठू,
बरे संत संस्कार,

स्वयंघोषित माहात्म्यांना
दुरून नमस्कार !
दुरूनच नमस्कार !



1 comment:

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...