रतीबांच्या बाजारी ,शब्दचतुर व्यापारी,
वस्त्र जरी जरतारी,म्लानवदन 'हि
कविता'.
नवोन्मेष वृक्ष झडे
,प्रतिभेचा चंद्र दडे,
शब्दच्छल नित्य घडे,गर्भगळीत ' हि कविता'
क्षण फुलती
आनंदी, दुःख कुठे
आक्रंदि ,
जोजवि त्या
बनून शब्द ,वत्सलवन
,ती कविता.
झळाळून तेज उठे
,दैन्यतिमिर कोष फुटे,
अग्निपुष्प ,वैशाखी,लखलखते
ती कविता.
खळखळता ,मुक्त झरा
,शुध्दहृदय ,नित्य खरा,
तुकयाचा शब्द शब्द
,वृद्ध जरी ' ती
कविता".
No comments:
Post a Comment