Thursday, March 12, 2020

प्रेम


तिच्याचसाठी कितीक तयाने ,लिहिल्या असतील प्रेम कविता,
चंद्र चांदणे,हिरवळ,पाऊस,असतील थकले गाता गाता.

परी अनामिक होती हुरहूर, ऊन पावसाच्या  खेळांची.
सहवासातून सलज्ज सुमने ,होता नेत्रीं मौंन कळ्यांची .

------------------------

आता तनांच्या आवेगातच ,चंद्र मनांचे क्षितिजी बुडती,
तरल क्षणांची लाज पाखरे ,मिटुनी डोळे,भिऊन उडती.

बेफिकीरांच्या उठवळ गाथा,तनामनांच्या या निरगाठी!.
सुटणे अवघड,नशिबी तुटणे!फुटकी नाती घेऊन पाठी.

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...