एक फुल बागेमधलं ,
स्वत:मधेच रमलेलं,
मुग्धपणाच्या वेलींमधून
बागडताना श्रमलेलं.
एक फुल, अत्तरगंध,
कुपीत घेऊन निजलेलं.
आखीव रेखीव कुंपण मोडून ,
मुक्तांगणात सजलेलं.
काय माहित कुपीत त्याच्या,
कस्तुरीचा परिमळ असेल!
प्राजक्ताच्या देठांमधून,
स्वप्न हळूच गोड हसेल!
एवढं मात्र नक्की शेवटी
फुल अंगी फुलणार,
रंग गंध त्याचा त्याचा
पसरवून दरवळणार.
आपल्या हाती बाग आहे,
जमेल तेव्हढी फुलवायची.
वार्यासोबत गंमत गाणी
गाऊन फुले झुलवायची.
.🍃संतोष
स्वत:मधेच रमलेलं,
मुग्धपणाच्या वेलींमधून
बागडताना श्रमलेलं.
एक फुल, अत्तरगंध,
कुपीत घेऊन निजलेलं.
आखीव रेखीव कुंपण मोडून ,
मुक्तांगणात सजलेलं.
काय माहित कुपीत त्याच्या,
कस्तुरीचा परिमळ असेल!
प्राजक्ताच्या देठांमधून,
स्वप्न हळूच गोड हसेल!
एवढं मात्र नक्की शेवटी
फुल अंगी फुलणार,
रंग गंध त्याचा त्याचा
पसरवून दरवळणार.
आपल्या हाती बाग आहे,
जमेल तेव्हढी फुलवायची.
वार्यासोबत गंमत गाणी
गाऊन फुले झुलवायची.
.🍃संतोष
No comments:
Post a Comment