पूर्वसुरींच्या
वाटेवरती,
सौंदर्याने असता मोहित
मनात चमके चांदणदृष्टी,
नवीन वाटा
मजला दावीत
धुळाक्षरे ती गिरवीत
असता ,
काही स्वयंभू आकार दिसती
अर्थ लावता शब्द
तोकडे
शब्दांविण मग उरात
ठसती .
आता साकडे त्यास
घालतो
तुम्हीच तुमचे द्या
भाषांतर
तथास्तु म्हणुनी रूपक बनुनी
आले करुनि ते
वेषांतर.
No comments:
Post a Comment