Thursday, March 12, 2020

जात


संन्याशाची पोरे, त्यांना मिळे शेणभिक्षा
सोनखत केले ,फळ अमृताचे वृक्षा .

तापलेल्या वाळूतले, उचलले तान्हे ,
भ्रष्ट झाले नाथ ऐसे भुंकलीत श्वाने.

तरी केले तेच ,वाटे सत्य हृदयाला ,
जनार्दन धाला, दत्त द्वारपाल झाला .

जाती जाती मध्ये ज्यांनी विभागले संत ,
बगळ्यांचे वेष ,त्यांचे लांडग्याचे पन्थ .

नामदेव शिंप्यांचेच ,सावता माळ्यांचा?
अर्थ उलटाच केला संतांच्या मेळ्याचा .

पहा उघडून डोळे ,शुद्ध हे लबाड ,
जाती वंत चोर ,मनि मतांचे घबाड .


आम्हा बडव्यांचे काय ?
फक्त हवे पाय.

विठ्ठलाची जात काढे
कोण व्याली माय ?

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...