काळोख काजळ डोळ्यात
माखत,
शांतता चाखत ,रात्र
येते.
काळ्याकुट्ट राती ,अंधाराच्या
वाती,
गुढ्स्वरे गाती,दिवाभीते.
दृश्याचे दृश्यत्व,थिजून गोठले,
दिशांचे सुटले भान
आता.
साऱ्या अनोळखी ,ओळखीच्या वाटा,
सावल्यांच्या
लाटा,उसळती.
भय फुलापरी,उमलून सुकले,
वारूही थकले,कल्पनांचे.
सारुनी शहारे,मन
झाले धीट,
चांदण्याची तीट, काळोखाला.
रंग विरुनीया मन कृष्णरंगी,
सेवी एकरंगी विश्वकाला.
No comments:
Post a Comment