सूर्य माथी, ऊन
उते
गर्दी त्यात,
गाडी रुते .
स्वेद माखलेल्या काखा,
हौर्न वेड्या मारी
हाका.
द्या हो बाबा,दादा दे
रे ,
काही फिरले हाकारे
चिकटली जागोजाग
भिकाऱ्यांची पोरे सोरे
.
आली भिकारीण कुणी
बाळ पोटी कवळोनि
.
भुकेजल्या पोरासाठी
मागे भीक कळवळोनि.
रडे आक्रन्दूनी तान्हे
काही ओघळली दाने.
परी अकल्पित काही,
घडे, थक्क गर्दी
ज्याने .
येता अकस्मात वात
दिसे शिशु नग्न
आत ,
तीक्ष्ण चिमटयांचे वळ,
गुंतलेले तिचे हात
.
फुटे कुणाचा संताप
,
देई कुणी शिव्या
शाप .
कोणी शहाजोग बोले
,
घोर कलियुगी पाप .
दया बुद्धी इथे
फोल ,
शुद्ध धंदा ,विके
मोल ,
'दान करी नादान'
हे
सार्थ आठवती बोल
.
हीमनगाच्या टोकाचे
आत वास्तव निराळे.
दूर अंधाऱ्या बोळात
जागे तरसांचे डोळे.
प्रतिक्षिप्त प्रवासाने
घरी पोचले शरीर
मन अजून गर्दीत
आत जाई खोल खोल.
हीमनगाच्या टोकाचे
आत वास्तव निराळे.
दूर अंधाऱ्या बोळात
जागे तरसांचे डोळे.
प्रतिक्षिप्त प्रवासाने
घरी पोचले शरीर
मन अजून गर्दीत
आत जाई खोल खोल.
No comments:
Post a Comment