परिमाणांनी परिमित नाही,
परिणामांनी सिद्ध असे,
सत्य सनातन,नितळ
झर्यापरी,
वितंड कुपी
बद्ध नसे!
तीक्ष्ण तर्क,अन
बुद्धिवाद हा,
सुसह्य करण्या,जीवगती.
नको चिकित्सा अतीव जयाने,
नास्तिक होईल,शुद्धमती.
छेदन सोपे,कठीण
निर्मिती,
भेदन सोपे,कठीण
जागृती.
मूर्त कल्पना अमान्य
करण्याआधी करोनि
पाहू कृती.
सहस्त्रवर्षे
धगधगणारा,
होमकुंड हा,नच
विझणारा,
मयूर नव्हे,ना,शुक हा
बाष्कळ,
गरुड गगन गिरिगृही
रमणारा.
चित्सुखरस हा,नित
स्त्रवणारा,
अनुभूतींतुन,मनि मुरणारा.
संतपदी,अन ऋषिऋचांतून,
लोककथांतून,पाझरणारा.
प्राशन करता,बोल
उमटतील,
विग्रह मूर्ती,जिवंत
नटतील.
भास नव्हे,ना
मानस चाळे ,
तेज शक्तीच्या रूपात खेळे.
ओज पूर्वीचे,नववस्त्रांकित,
शुद्ध मनांनी,होई
अंकित.
कशास आता साक्षी
पुरावे,
कशास व्हावे उगाच
शंकित.
गुरुमार्गावर
ज्यांचे पाऊल,
तयास लागे अंतरचाहूल.
परंपरा अन रूढी
यातला
भेद इथे मग स्पष्ट
दिसे,
सत्य सनातन ,नितळ
झर्यापरी,
वितंडकुपी बद्ध नसे.
.🍃संतोष
No comments:
Post a Comment