अशीही माणसं,जगून
गेलीत,दुःखांचे गुणाकार
भागून गेलीत.
भवतालच्या आगीत,वेदनांच्या
धगीत,
स्वप्नांचे अंकुर जळत
असताना,आपल्याच अश्रूंचं
सिंचन करून,
आयुष्याची बनं फुलवून
गेलीत!
पहाटवाटांवर
,सोनेरी घाटांवर ,सूर्याच्या
साक्षीने,दवांच्या नक्षीने,
फुलांचे गाल कुरवाळत
असताना ,
स्वतःच्या पोटात, मौनातल्या
ओठांत ,अपमानाचे घोट
पचवून गेलीत.
No comments:
Post a Comment