Monday, March 9, 2020

चैत्रांगण

चैत्रांगण ,चैत्रांगण....

रुणझुणले सौख्याच्या
सनईने हे अंगण.......

दरवळल्या अत्तरांत,
घमघमल्या सौरभांत,

मूर्तीमंत अंबिकाच
घरभर देती दर्शन...

चैत्रांगण....(१)

रसनेचा स्वाद दुणा,
डाळ,पन्हे चाखताना,
तृप्त तरी नच रसना.
म्हणे अजुन मज द्या ना.

टपोरल्या हरभर्यांस
ओटीमधे आमंत्रण...
चैत्रांगण....(२)


उंबरठ्यावरती असे,
घुटमळून गौर कुणी,
नेत्री भीड,मनी आशा,
अडखळती मुखी वाणी.


चतुरंगी चार फास
परतीच्या मार्गी तिच्या,
धवलहरित नीलरक्त
भिन्न वेद भिन्न ऋचा.

हाक द्या,ती येईल,
केशरात मग न्हाईल.
अक्षय तृतीया होईल,

सार्वभौम सार्वत्रिक
विश्वाचे हे प्रांगण..........

चैत्रांगण....(३)

                    .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...