Monday, March 9, 2020

निरांजन

शांत निरांजन देवापुढले,
चौकामध्ये कुणी ठेवले?

फिरण्यार्यांनी केल्या चर्चा,
कुणी म्हणे ते मंद तेवले!

अफाट स्वातंत्र्याच्या गप्पा,
शिळ्या कढीला उधाण आले,

भर बाजारी,मचाण ठोकून,
दबा धरोनी भाले बसले.

प्रबंधातल्या लसी टोचूनी,
गलेलठ्ठ जे झाले उंदीर,

वात पळवली निरांजनातून,
भकास केले अवघे मंदिर.

पुरे मना रे झुळुक कोवळी,
तुळशीवरुनी आली वाहत.

नको अपेक्षा,दीपमाळांची,
अन् गंधांची चंदनचर्चित.

                  .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...