बन वेळुंचे फुलले होते,
युगे लोटली,त्याला आता.
कधी लावले,कोणी,कैसे,
पुष्कळ ग्रंथी,बाष्कळ गाथा.
कुणी सांगते या जातींचे
त्या जातींशी झाले संकर,
कुणी सांगते अमुक काली
यांना फुटले पहिले अंकुर.
सुरकुतल्या गात्रांची कोणी,
मला भेटली तिथेच वृद्धा.
औत्सुक्याच्या प्रश्नफुलांची
उधळण केली,मग मी सुध्दा!
म्हणे मुला हे गुपित सांगते
जैसे आले माझ्या कानी,
स्वतः स्वतःला पेरुन गेले,
कुणी दयाळू येथे द्न्यानी.
मोहन भुलला येथे,त्याला
पहा मिळाली गोड पावरी,
प्राण फुंकले त्याने, झाली,
शांत राधिका,गोप बावरी.
नवसृजनाची गुढी,वेळूची
अमुचे अंगण मग चैत्रांगण,
सजती मांडव मंगलसमयी,
वेळुमय हे अमुचे जीवन.
फुलतो वेळु फक्त एकदा,
परार्थ सारे नंतर जीवित.
कालप्रवासा जातानाही
त्याची आमुची अखंड सोबत.
उभे आडवे छेद घेऊनी,
कशास करणे शुष्क परीक्षा?
कार्य तयांचे झाले,घेऊ,
जमले तर त्यांपासून दिक्षा.
नसेन मी अन् नसशील तुही,
परंतु मजला ठाऊक आहे,
युगे लोटली,तरीही खंबीर,
बन वेळूंचे शाश्वत आहे.
.🍃संतोष
युगे लोटली,त्याला आता.
कधी लावले,कोणी,कैसे,
पुष्कळ ग्रंथी,बाष्कळ गाथा.
कुणी सांगते या जातींचे
त्या जातींशी झाले संकर,
कुणी सांगते अमुक काली
यांना फुटले पहिले अंकुर.
सुरकुतल्या गात्रांची कोणी,
मला भेटली तिथेच वृद्धा.
औत्सुक्याच्या प्रश्नफुलांची
उधळण केली,मग मी सुध्दा!
म्हणे मुला हे गुपित सांगते
जैसे आले माझ्या कानी,
स्वतः स्वतःला पेरुन गेले,
कुणी दयाळू येथे द्न्यानी.
मोहन भुलला येथे,त्याला
पहा मिळाली गोड पावरी,
प्राण फुंकले त्याने, झाली,
शांत राधिका,गोप बावरी.
नवसृजनाची गुढी,वेळूची
अमुचे अंगण मग चैत्रांगण,
सजती मांडव मंगलसमयी,
वेळुमय हे अमुचे जीवन.
फुलतो वेळु फक्त एकदा,
परार्थ सारे नंतर जीवित.
कालप्रवासा जातानाही
त्याची आमुची अखंड सोबत.
उभे आडवे छेद घेऊनी,
कशास करणे शुष्क परीक्षा?
कार्य तयांचे झाले,घेऊ,
जमले तर त्यांपासून दिक्षा.
नसेन मी अन् नसशील तुही,
परंतु मजला ठाऊक आहे,
युगे लोटली,तरीही खंबीर,
बन वेळूंचे शाश्वत आहे.
.🍃संतोष
No comments:
Post a Comment