Thursday, March 12, 2020

कवी


कुण्यादेशी,कोण्या काळी,स्वप्नभोळा कवी,
क्षितीजाच्या पार राही,कल्पनेच्या गावी.

मोरपिशी शब्द त्याचे,भाषा मखमल,
चांदण्याच्या प्रकाशात शोधे रानभूल.

अस्तित्वाचा सूर्य जेव्हा शिरी भडकला,
स्वप्ननिळा चंद्र त्याचा,उरी तडकला.

फिरे आता दऱ्यांतून,आणि वाहे,वाऱ्यांतून,
अंश पेरी,पाहुनिया भूमी.

त्याचे व्रत पेरण्याचे,रुजवणे या धरेचे,
फुले,फळे,वेचू आम्ही, तुम्ही.

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...