Thursday, March 12, 2020

सापेक्ष


प्रत्येक गोष्ट असते सापेक्ष,
जसा घ्याल तसा तुमचा पक्ष.

उजेडाचं अस्तित्व,अंधारामुळं आहे,
उन्हातल्या चटक्यांमुळेच,सावली गोड आहे .

मनाजोगं घडताच सगळं,
संसार वृक्षछाया,
विपरीत घडतात गोष्टी तेव्हा,
संसार निव्वळ माया.

विटले बाई म्हणणारी ,सजते नटून थटून!
थकलो बुवा म्हणणारा ,काम करतो झटून!

तोच सूर्य,तेच डोंगर,तेच नदी नाले,
तीच गर्दी,तेच चेहरे,किती आले गेले!.

पाहीले तर तेच तेच, पण रोज नवे,
उगा का मग नको,नको!
जर मन म्हणते हवे…….

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...