सूर्य चंद्र आणि
तारे,नदी नाले,गिरी,वारे,
उपमा नि अलंकार,यमकांचे सोपस्कार.
प्रतिभेच्या स्पर्शाविण,अर्थशून्य हा
व्यापार.
नाव चाले सागरांत,दर्प नावेने
करावा?
येता सागराची लाट,पुरे
एक हेलकावा.
अर्थवाही शब्दनौका,शीड भरे स्वप्नवारा,
येथे प्रवासाची शोभा,आहे निमित्त किनारा.
No comments:
Post a Comment