तिच्या अस्तित्वाचा त्याला जन्म
होताच उबारा,
विश्वरुपापरी
तिचा,त्याच्या फांद्यांना
फुलोरा.
कधी चाफ्यांचे सुवास,कधी
जुईलीचे श्वास,
मणी ,मोतियांची रास कधी चांदण्यांचे भास.
कधी प्राजक्ताचा सडा,कधी सोवळ्याचा घडा,
करी साखरेचा खडा ,कधी
रंगलेला विडा.
कधी धरलेले कान,कधी अभ्यंगाचे
स्नान,
करी बांधल्या धाग्याचा, कधी
औक्षणानी मान.
कधी चिमण्या मुठींचे ,घट्ट
बोटांवरी स्पर्श.
डोळ्यांतुनी सांडणारा ,तीचा त्याच्या
साठी हर्ष.
त्याचे वेढूनीया विश्व,पुन्हा
उरे दशांगुळे.
ऐसे अद्वैताचे नाते ,त्यांचे विश्वासाच्या बळे
.
No comments:
Post a Comment