पहाटपक्षी पहाता क्षितीजी,
प्राजक्ताने सडा शिंपला.
किरणकळ्यांना फुटे धुमारा,
तिमीरपटावर खेळ संपला.
बहर वेचला ज्या हातांनी,
अर्पियण्या चरणांवर ओंजळ,
गंध मिळाला सहजपणे त्यां,
जीवन अवघे झाले सोज्वळ.
काही अनामिक अनुभव असले,
शब्दतराजू तोलू न शकती,
चित्र तेच तरी नवी प्रभावळ,
काव्यकुंचले अखेर थकती.
जसे उमटते दिशांत गाणे
तसेच अलगद,हृदयी जपावे.
कुंवार काही आपुले अनुभव
शब्दांवाचून मनी लपावे.
.🍃संतोष
प्राजक्ताने सडा शिंपला.
किरणकळ्यांना फुटे धुमारा,
तिमीरपटावर खेळ संपला.
बहर वेचला ज्या हातांनी,
अर्पियण्या चरणांवर ओंजळ,
गंध मिळाला सहजपणे त्यां,
जीवन अवघे झाले सोज्वळ.
काही अनामिक अनुभव असले,
शब्दतराजू तोलू न शकती,
चित्र तेच तरी नवी प्रभावळ,
काव्यकुंचले अखेर थकती.
जसे उमटते दिशांत गाणे
तसेच अलगद,हृदयी जपावे.
कुंवार काही आपुले अनुभव
शब्दांवाचून मनी लपावे.
.🍃संतोष
No comments:
Post a Comment