शब्द फुला रे शब्द फुला,
मौन कळ्यांची शपथ तुला.
नाजूक तुझी रे दले ,पाकळ्या,
नकोस खेळू उंच झुला.।धृ।
काही कळ्यांना मूक राहुदे,
स्वानंदी रंगून राहुदे.
चंचल वारा,दृश्य पसारा,
भृंगवृंद भुलवील तुला.(१)
स्पर्धा कसली,सुटता दरवळ.
भिन्न फुलांतून ,असंख्य परिमळ,
उगाच आता कशास तुजला,
हिरेजडित सुवर्णतुला?(२)
काही फुले गजर्यांत गुंफतील,
काही फुलांच्या माळा सजतील.
घाऊक काही गंधपिपासू
अर्क अत्तरांसाठी पिळतील.
फुलपाखरे कौतुक करतील,
पराग काही घेऊन उडतील.
फुलणे केवळ धर्म तुझा रे,
पुढची का रे फिकिर तुला?(३)
जन्म सफल जरी जाल राउळी,
कुणी वाहतील,भरुन ओंजळी.
गंधीत गाभारा गंधाने,होता,
स्फुरतील मंजुळ स्तवने.
क्षणभर सरतील क्लेश, सांगतील,
प्रफ़ुल्लित वदनेच तुला. (४)
जात तुझी कोणी रे पुसली?
विविध फुलांतून प्रतिभा हसली.
तुला न ठाऊक तव गंधाने,
किती आयुष्ये ती रसरसली!
गंध उराशी तोवर हे ऋण.
सुकता,घे तू स्वतःस पेरुन.
पुन्हा नव्याने बहरां येशील,
मातीचे हे वचन तुला (५)
.🍃संतोष
मौन कळ्यांची शपथ तुला.
नाजूक तुझी रे दले ,पाकळ्या,
नकोस खेळू उंच झुला.।धृ।
काही कळ्यांना मूक राहुदे,
स्वानंदी रंगून राहुदे.
चंचल वारा,दृश्य पसारा,
भृंगवृंद भुलवील तुला.(१)
स्पर्धा कसली,सुटता दरवळ.
भिन्न फुलांतून ,असंख्य परिमळ,
उगाच आता कशास तुजला,
हिरेजडित सुवर्णतुला?(२)
काही फुले गजर्यांत गुंफतील,
काही फुलांच्या माळा सजतील.
घाऊक काही गंधपिपासू
अर्क अत्तरांसाठी पिळतील.
फुलपाखरे कौतुक करतील,
पराग काही घेऊन उडतील.
फुलणे केवळ धर्म तुझा रे,
पुढची का रे फिकिर तुला?(३)
जन्म सफल जरी जाल राउळी,
कुणी वाहतील,भरुन ओंजळी.
गंधीत गाभारा गंधाने,होता,
स्फुरतील मंजुळ स्तवने.
क्षणभर सरतील क्लेश, सांगतील,
प्रफ़ुल्लित वदनेच तुला. (४)
जात तुझी कोणी रे पुसली?
विविध फुलांतून प्रतिभा हसली.
तुला न ठाऊक तव गंधाने,
किती आयुष्ये ती रसरसली!
गंध उराशी तोवर हे ऋण.
सुकता,घे तू स्वतःस पेरुन.
पुन्हा नव्याने बहरां येशील,
मातीचे हे वचन तुला (५)
.🍃संतोष
No comments:
Post a Comment