कोपर्यात
शांत उभ्या आहेत
आमच्या केरसुणी बाई,
अंग मोडून रोज करतात
घरातली सफाई.
ज्याच्या
हाती जातील त्यांना,
तैशी येई गती.
काम तेच असले तरी
त्याच्या
तर्हा किती?
चुकून फुटल्या काचा,
सुटून सांडला ओचा,
केरवारे नेमाचे,
बाळ पसारे प्रेमाचे.
काडी कचरा, कपटे न काय.
आवरून थकतात केरसुणी बाय.
दिसली कुठे टापटीप ,
कौतुक दाटलं मनि
विसरू नका ,राबली आहे.
कुणी केरसुणी.
No comments:
Post a Comment